मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या असून नागरिक ही हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून काही भागात येलो अलर्ट जारी करण्या आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे.

अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.