कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथील एका फार्म हाउसजवळ उघडयावर तीन पानी जुगार खेळणाऱ्या अड्डयावर करवीर पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकून ९ जणांना अटक केली. त्याच्याकडून २८ हजाराची रोकड, मोबाईल हँडसेट, दुचाकी व जुगाराचे साहित्य असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कळंबा येथील एका फार्म हाउसजवळ उघडयावर तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या निलेश बाबूराव गवळी (वय ४२, रा. शिंगणापूर ता. करवीर), विश्वास सदाशिव जगताप (वय ४५, रा. कळंबा), रोहन अशोक भोसले (वय ३१, रा. सुतार माळ, लक्षतीर्थ वसाहत), वैभव विक्रम कुलकर्णी (वय २६, रा. राजोपाध्येनगर),  रणजित महादेव पाटील (वय ३६, रा. कौलवपैकी बरगेवाडी, ता. राधानगरी), विलास तुकाराम कळंबकर (वय ४९, रा. निढोरी),  हरी परशू साठे (वय ७५ रा. वळीवडे), मारुती शामराव चव्हाण (वय ५५, रा. चिखली ता. करवीर), गजानन उत्रे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.