जयसिंगपूर (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या काळात झालेली कामे सर्वसामान्य लोकांना माहीत आहेत. आम्ही सुसंस्कृत असल्याने स्पष्टपणेच बोलतो, त्यामुळे विरोधकांकडून कावकाव केली जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडेच राहील, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी जयसिंगपूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले की, पदवीधर निवडणूक विचारांवर होत आहे. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत हात वर करत आहेत. या सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उद्योगपती विनोद घोडावत, राजेंद्र मालू, विनोद चोरडिया, राहुल घाटगे, पृथ्वीराज यादव, मोहनराव कुलकर्णी, राजेंद्र दाईंगडे, आदी उपस्थित होते.