कोल्हापूर (प्रतिनिधी) : सानेगुरुजी येथे उपनगरातील लोकांसाठी मैत्रांगण अपार्टमेंट येथे नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. विविध संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाला मदतीसाठी ओघ वाढला असल्याचे दिसून येत आहे. आज (बुधवार) अमृत चित्रकार, अमोल पाटणे त्यांचेकडून ६ स्पीकर्स, १ एंपलीफायर, १ माईक देण्यात आले.
कै. गो. स. न्हिवेकर फौडेशन कोल्हापूर यांच्याकडून सर्जिकल तिजोरी तसेच संगणक साठी ५ हजार रुपये रोख भेट दिली. तसेच सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम यांच्याकडून कै. मा. महापौर, दिलीप मगदूम यांच्या पुण्यतिथी निमित्त हॉस्पिटलला मॅटिंग, ७ सर्जिकल ट्रे, सेनीटायझर बॉटल्स भेट दिल्या.
यावेळी नगरसेवक शारंगधर वसंतराव देशमुख (माजी स्थायी सभापती को.म.न.पा.), गुरुप्रसाद जोशी, किरण पाटील, सुयोग मगदुम, अमृत चित्रागार, अमोल पाटणे, ललित पाटील, राहुल रजपुत, शाहिद मोमीन, राहुल पाटील, प्रकाश रानगे, दीपाली काळे, सायली गावडे, सोनाली पिलावरे, सुप्रिया पाटील, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.