नवी मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झाले आहेत. देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे ट्रकचालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे. नवी मुंबईतही या कायद्याच्या विरोधात वाहनचालक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र उरण जेएनपीटी मार्गावर आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारीत केल्याने राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. या विरोधात अवजड वाहतूक करणारे ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. उरण जेएनपीटी मार्गावरही ट्रक चालकांनी रास्तारोको करत आंदोलन सुरु केले आहे.

यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक ट्रकचालकांनी यावेळी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली आहे.