मुंबई (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदींचा ‘दारुडे’ असा उल्लेख केला. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातच अडकण्याची शक्यता आहे.  पंतप्रधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.   

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळे विकायला निघाले आहेत.  मोदी रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे, तरी ते विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हाच गोष्टी अशा पद्धतीने विकायला काढल्या जातात, असेही आंबेडकर म्हणाले.