मुंबई/ प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात लढण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

तर महायुतीने दक्षिण मुंबई मध्ये अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु दक्षिण मुंबईतून महायुतीकडून मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित नाही, ही जागा शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुटण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एनडीएकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. एनडीएतील ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जाणार आहे. भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिवसेनेचे यशवंत जाधव निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

मिलिंद नार्वेकरांना शिंदेसेनेकडून ऑफर
मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडल्यास ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ठाकरेंची काही गुपिते दडलेली आहेत, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या जाण्याने ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. नारायण राणे यांनी सेना सोडली, तेव्हा त्यांनी नार्वेकर यांच्यावर त्यांच्यात आणि नेतृत्वामध्ये संवादाची दरी निर्माण केल्याचा आणि त्यांचे फोन उचलत नसल्याचा आरोप केला.