सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्या नावची घोषणा केली आहे. तर काल भाजपनेही सोलापूरसाठी उमेदवार जाहीर केला आहे. माळशिरसचे आमदार राम शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. आता राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यांनतर कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एक खुलं पत्र लिहिले आहे. सातपुते हे मुळचे सोलापूरचे नसून ते बाहेरचे उमेदवार आहेत, असे चित्र शिंदे यांच्याकडून निर्माण करण्याचा प्रत्न केला जातोय. तसेच सोलापूरची लोक म्हणून मी राम शिंदे यांचे स्वागत करते, असेही प्रणिती यांनी म्हंटले आहे.

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीने याआधीच सोलापूरची उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दरम्यान, सोलापुरात सातपुते विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. तर प्रणिती शिंदे यांच्या पत्राने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सोलापूर मतदारसंघात शिंदे विरुद्ध सातपुते अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे प्रणिती शिंदे यांच्याकूडन राम सातपुते यांना आतापासूनच लक्ष्य केलं जातंय. त्यांनी समाजमाध्यमांवर राम सातपुते यांच्या नावाने एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात सातपुते हे आयात केलेले उमेदवार आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. आपलं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरच. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते, असं प्रणिती शिंदे आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.

भाजपाची पाचवी यादी रविवारी जाहीर झाली आहे. या यादीत १११ जणांची नावं आहेत. विशेष बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातली तीन नावं आणखी आहेत. ४८ जागांपैकी महाराष्ट्रात भाजपाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिलं आहे.

तसेच या पत्रात, लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहित जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वांत जास्त महत्त्व असावं, असं मतही शिंदे यांनी या पत्रात व्यक्त केलं.

पुढील 40 दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू. समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, असे आवाहनही शिंदे यांनी राम सातपुते यांना केले.

ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवुया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे.