कोल्हापूर ( प्रतिनिधी) : इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय (आयजीएम) पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरु करावे, कोरोनामुळे मयत नगरपालिका कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. 

यावेळी आयजीएममध्ये फक्त स्पेशल रूममध्ये कोरोनाबधित रुग्णावर उपचार होतात. इतर सर्व विभागात पूर्वीप्रमाणे सर्वच आजारांवरील उपचार, आरोग्यसेवा सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, संजय केंगार, अहमद मुजावर, महावीर कुरुंदवाडे आदी उपस्थित होते.