टोप (प्रतिनिधी) : टोप येथील माजी शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठलपंत पाटील यांचे चिरंजीव प्रज्वल विठ्ठलपंत पाटील याची दुबईच्या बहुराष्ट्रीय कंपनीत लीड सॉफ्टवेअर इंजिनियरपदी नियुक्ती झाली आहे.

प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण टोप येथील शिवराज विद्यामंदीर येथे झाले. त्यानंतर आदर्श गुरुकुल तसेच डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक, केआयटी या ठिकाणी विशेष प्राविण्यासह शिक्षण झाले. प्रज्वल हा बेंगलोर येथील डेल टेकनॉलॉजी या कंपनीत महत्वाची सॉफ्टवेअर विकसित करण्यात अग्रभागी होते.

त्याला डॉ. डी. एस. घुगरे, प्रा. अजय कापसे, प्रा. महादेव नरके यांचे मार्गदर्शन लाभले. प्रज्वलचे टोपसह परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.