पन्हाळा (प्रतिनिधी) : लॉकडाउनच्या काळापासून आज अखेरपर्यंत पन्हाळगडा पर्यटकांसाठी बंद होता. मागील वर्षीच्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे सुद्धा पन्हाळगड पूर्णपणे बंद होता. यावर्षी कोरोनामुळे पन्हाळा गड बंद होता. याचा सर्व फटका इथल्या व्यावसायिकांवर पडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
पन्हाळा गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या वर अवलंबून असणाऱ्या जवळपास सत्तर टक्के लोक व्यावसायिक आहेत. पन्हाळा गड पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशा मागणीचे निवेदन इथल्या व्यावसायिकांच्याकडुन मुख्यआधिकारी स्वरूप खरगे यांना देण्यात आले होते. या निवेदनाची अवलंबजावणी करून आज पन्हाळगड सुरु करण्याचा निर्णय देण्यात आला.
या सर्वांचा विचार घेऊन नगराध्यक्षा रूपाली धडेल व मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांनी सर्व नियमांचे पालन करून सर्व व्यवसायिकांना नियमावली देऊन पन्हाळगड हा येत्या १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत खुला करण्यात येत आहे. त्याच बरोबर सोशल डिस्टन्स, मास्क ,सॅनिटायझर हे सर्व बंधनकारक राहील. त्याचबरोबर खाद्यपदार्थ हे पार्सल स्वरूपात दिले जातील. पन्हाळा गडावरील सर्व व्यावसायिकांकडून पन्हाळागड खुला झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, रविंद्र धडेल, संग्रामसिंह भोसले, सतीश भोसले, प्रविण शिंदे, मिलिंद कुराडे, मंदार नायकवडी, मारूती माने तसचे व्यावसायिक उपस्थित होते.