कोथळी – करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यामध्ये कुरुकली येथे असलेल्या कोविड सेंटरला करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले व आरोग्य अधिकारी जी. डी. नलवडे यांच्याकडून प्राथमिक हा ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रदान करण्यात आला.

प्रत्येक तालुक्याला एक प्रमाणे जिल्ह्यात बारा ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रधान करण्यात आला. तसेच जिल्ह्यामध्ये एक रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये समितीच्या दोन हजार पाचशे सदस्यांनी १४ लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.

कोरोना रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सुविधेची कमतरता भासत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्ह्यामध्ये बारा ऑक्सिजन निर्मित जनरेटर प्रधान करण्यात आले. एक रुग्णवाहिका जिल्ह्यामध्ये प्रदान करण्याचा मानस आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे होत्या.

यावेळी शिक्षक नेते कृष्णात कारंडे, पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, गटविकास अधिकारी जयवंत उघडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, विजय भोसले, करवीर गटशिक्षणाधिकारी शंकराव यादव, शालेय पोषण आहार अधीक्षका वसुंधरा कदम, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, दिगंबर मेडसिंगे, भोगावती कारखान्याचे संचालक पांडुरंग पाटील, भोगवती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील, नामदेवराव पाटील, शिक्षक समितीचे बाबासाहेब धुमाळ, हरिदास वरणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सुरेश कोळी यांनी केले. वर्षा केनवडे यांनी आभार मानले.