कळे (प्रतिनिधी) :   मल्हारपेठ, मोरेवाडी, जाधववाडी या चार गावांचे ग्रामदैवत असलेल्या सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदीरात दसऱ्यानिमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच परिसरातील दोनशेहून अधिक भाविकांनी नवरात्रीचा उपवास धरला आहे.

प्रत्येक दिवशी श्री. जोतिबाची मंदिरांचे पुजारी युवराज गुरव यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात पुजा बांधण्यात येते. पहाटेच्या वेळी काकड आरती, पुजा आणि रात्री भजनाचे कार्यक्रम होतात. तसेच रात्री हलगीच्या आणि  पारंपारीक वाद्यांच्या गजरात वाजत-गाजत पालखी काढली जाते. यावेळी नऊ दिवस मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

यावेळी  मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. बुधवारी जागराच्या दिवशी सकाळी जोतिर्लिंगाच्या सभोवती दंडवत घातला जातो. गुरुवारी मंदिराच्यासमोर सासनकाठीचा कार्यक्रम आणि शुक्रवारी रोजी मल्हारपेठ येथे जागराचा कार्यक्रम होणार आहे. जागरादिवशी परंपरागत मर्दानी खेळाचे कार्यक्रम होतात. यामध्ये दांडपट्टा, लाठीकाटी, लेझीम, जब्बर दांडू, बंदाटी, ईट्टा आदी मर्दानी खेळ खेळले जातात.