मुंबई (प्रतिनिधी) : भाजपमध्ये एकनाथ खडसे ज्येष्ठ होते. ते पक्षातच राहावेत, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानावर टीका करणारे व्टिट खडसे यांनी रिव्टिट केले. यानंतर मी त्यांना संपर्क केल्यावर ते व्टिट डिलीट केल्याने ते पक्षातच राहतील, असे वाटले होते. झाले उलटेच. त्यांचा राजीनामा मिळाला. पण पक्षाचा राजीनामा माझ्याकडे येईपर्यंत मी आशावादी होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प!कार परिषदेत दिली.
ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचे फडणवीस यांच्याबद्दल काही आक्षेप होते. यावर फडणवीसांनी वेळोवेळी खुलासा केला आहे. तरीही पुन्हा काही तक्रारी असतील तर एक! बसून सोडवू, असे त्यांना सांगत होतो. पक्ष सोडू नका, अशी शेवटपर्यंत मनधरणी करत होतो. पक्षाने त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार शेवटपर्यंत ते पक्षातच राहावेत, आमचे नेतृत्व करावेत, यासाठी प्रयत्न केले. पण यास यश आले नाही. ते पक्षाचा राजीनामा दिल्याचे कटूसत्य स्वीकारले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा. ते ज्या पक्षात जात आहेत, तेथे त्यांनी समाजपयोगी कामे करावीत.