मुंबई ( प्रतिनिधी ) आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी शेअर बाजारात वातावरण सामान् असले तरी काही शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली. असाच एक शेअर आलोक इंडस्ट्रीजचा आहे. या कंपनीबाबत अशा बातम्या आल्या की गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीसाठी गर्दी केली.


मंगळवारी मुकेश अंबानी यांच्या आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक वाढले होते. या कंपनीचे शेअर्स ट्रेडिंग दरम्यान 19.87 रुपयांपर्यंत पोहोचले. 8 सप्टेंबर 2023 रोजी शेअरने 22.33 रुपयांची पातळी गाठली होती. हा समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाले तर ते 10 हजार कोटींच्या पुढे गेले आहे.आलोक इंडस्ट्रीजच्या बोर्डाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत 3300 कोटी रुपयांच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत समजल्यास, आलोक इंडस्ट्रीज मुकेश अंबानींच्या रिलायन्समधून ₹ 3300 कोटी उभारेल.

तिमाहीचे कसे आहेत निकाल ?

सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत, कंपनीची निव्वळ विक्री 19.99% ने घटून 1,359.02 कोटी रुपये झाली. सप्टेंबर 2022 मध्ये तो 1,698.58 कोटी रुपये होता. या तिमाहीत निव्वळ तोटा रु. 174.83 कोटींवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये एबिटा ४६.१८ कोटी रुपये होता. हे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 140.27% अधिक आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजकडे कंपनीत 75 टक्के हिस्सा होता. रिलायन्स इंडस्ट्रीज ही मुकेश अंबानी यांची कंपनी आहे.