धाराशिव/प्रतिनिधी : धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पत्र मल्हार पाटील यांनी अजित पवारांच्या सांगण्यावरून आपण 2019 ला भाजपात गेलो असा गैप्यास्फोट केला होता. तसेच आमच्या रक्तात राष्ट्रवादी आणि हृदयात भाजप असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते आणि धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मल्हार पाटलांना टोला लगावला आहे.

2019 ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला. तर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडली. आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे, असं मल्हार पाटील यांनी म्हटले होते. आता मल्हार पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार ओमराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पाटील परिवारावर टीका करत असे म्हटले की, राष्ट्रवादी का वाढवू यावर अजित दादा यांनी कमळाने यांना हाणले असेल.

क्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप असे मल्हार पाटील म्हणतात तर किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका म्हणजे शरीरात सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे, असा खोचक टोलाही ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. लोकांना गृहीत धरून राजकारण केले तर या गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने २०१९ मध्ये आम्ही राष्ट्रवादीसोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो की, त्यांनी आम्हाला आधी पाठवले आणि नंतर तेही भाजपाबरोबर आले. त्यामुळे तुम्ही आमची चिंता करु नका. आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचे काम, पूर्ण ताकदीने आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही”, असे मल्हार पाटील यांनी एका सभेत बोलताना म्हटले होते.
खासदार ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
“तुमच्या रक्तात राष्ट्रावादी, हृदयामध्ये भाजपा आहे. मी म्हणतो आता किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका. शरीराच्या सर्व पार्टमध्ये सगळे पक्ष गेले की रात्रीतून कोणत्याही पक्षात जायला मोकळे, काय समर्थन करत आहेत? लोकांना जर अशा पद्धतीने गृहीत धरुन चालले तर या गद्दारांना त्यांची जागा दाखवतील”, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.