शिंगणापूर (प्रतिनिधी) : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवास वातकर (सांगरूळ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्ष उत्तम वरुटे यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ही निवड करण्यात आली आहे.
कुंभी कारखान्यासाठी उपाध्यक्ष पदासाठी एक-एक वर्षाची संधी संचालकांना दिली जात असून आज (गुरुवार) झालेल्या उपाध्यक्ष निवडीत संचालक जयसिंग पाटील यांनी निवास वातकर यांचे नाव सुचवले. आणि त्यास संचालक आनंदराव पाटील यांनी अनुमोदन दिले. माजी आमदार व कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून एम. एम. जाधव, प्रभारी साखर सहसंचालक यांनी काम पाहिले.