नाशिक ( वृत्तसंस्था ) नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अशोक नजन (वय 40 ) या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या केबिनमध्ये गोळ्या झाडून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय 40 ) यांना आज आज सकाळी दहाच्या सुमारास स्वत: वर गोळ्या झाडल्या. याची माहिती मिळताच या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू असून काल बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यातच नजन यांनी जीवन यात्रा संपवल्याने आता चर्चा जोराने सुरु झाल्या असून, पोलिसांनी याबाबत तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.