बेलवळे खुर्द : “नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच विकासाची गती बदलली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत देश बदलला आहे,” ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. यामुळे संजय मंडलिक यांना मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बेलवळे खुर्द, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.

यावेळी दिनकर कोतेकर म्हणाले, येणाऱ्या 07 मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), मनोज फराकटे, सुनील सूर्यवंशी, विकास पाटील, नंदकुमार पाटील, सुधीर पाटोळे, सुभाष भोसले, नेताजी पाटील, शामराव पाटील, साताप्पा पाटील, संभाजी पाटील, वसंत पाटील, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.