मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण थोडे तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गेले दोन दिवस झाले लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच चालू होती. त्यामुळे . रत्नागिरी-सिंधुदुर्ग चर्चचा विषय ठरला होता. परंतु आता महायुतीकडून मतदारसंघासाठी भाजपमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या वेळी राणे म्हणाले, मी सामंत बंधूंचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्रा अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्धल मी त्यांचाही आभारी आहे. तसेच विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये 400 पार करायचं आहे. तसेच आपला देश विकसित बनावा आत्मनिर्भर बनावा हे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राणेंनी सांगितलं. तसेच उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, मी शक्तिप्रदर्शन करत नाही. परंतु अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास राणेंनी या वेळी व्यक्त केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागेवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये नारायण राणे यांना येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी गुरुवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. या नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या सोबत होणार आहे.