‍कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा वसुली पथकाने न्यू शाहूपुरी, मातंग वसाहत (राजारामपुरी) आणि शास्त्रीनगर परिसरात १ लाख १६ हजार ८६६ रुपयांची थकीत पाणी बिल वसूल केले.  दरम्यान, यापुढील काळात थकीत पाणी बिलाची वसुली गतीने केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख मोहन जाधव यांनी सांगितले.

याबरोबरच थकीत पाणी बिलासाठी या पथकाने  न्यू शाहूपुरी परिसरातील ३ नळ कनेक्शन धारकांची पाणी कनेक्शन बंद केली आहेत. या कारवाईत  मीटर रिडर संदीप माळी,  रमेश मगदूम,  फिटर तानाजी माजगांवकर यांनी सहभाग घेतला.