कोल्हापूर (प्रतिनिधी) : खरी कॉर्नर येथे घराजवळ लावलेली मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली. याबाबतची फिर्याद रविंद्र शंकर सोमशेट्टी (वय ४५, रा. देशपांडे गल्ली खरी कॉर्नर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविंद्र सोम शेट्टी यांनी त्यांची मोटारसायकल क्र एम एच ०९ पी ८००८ घराजवळ लावली होती. चोरट्यांनी ही मोटरसायकल लंपास केली याप्रकरणी सोमशेट्टी यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.