कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा पिढीला निवडणूक कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन राजकारण आणि नेतृत्व यांचा अनुभव घेता यावा. यासाठी कोल्हापूर परिसरातील युथसाठी पॉलिटिकल इंटर्नशिप प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे.

यावेळी राजकारणातील युवकांचा सहभाग वाढावा व त्या माध्यमातून सक्षम युवा पिढी घडावी. या हेतूने आमदार सतेज पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. तीन महिने कालावधीच्या या प्रोग्रॅमच्या माध्यमातून राजकारणातील बारकावे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी युवा पिढीला मिळणार आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेता येणार आहेत. त्याचबरोबर निवडणूक कॅम्पेनसाठी स्ट्रॅटेजी बनवण्याकरता त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहील.

यामध्ये हटके ट्रिक्स, नवनव्या संकल्पना वापरून कॅम्पेन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकाना योगदान देता येणार आहे. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून पोलिटिकल रिसर्च आणि डेटा टेक्निक्स शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होणार असून समाज मनावर ठसा उमटवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

राजकीय क्षेत्रातील अनुभव देणाऱ्या आणि उद्याचे सक्षम नेतृत्व घडविणाऱ्या या तीन महिने कालावधीच्या प्रोग्रामसाठी युवक युवतीनी inckolhapur.sm@gmail.com या मेल आयडीवर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी 9823719697 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.