कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पुणे विभागाचे आमदार जयंत आसगावकर यांनी 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत जुनी पेन्शनबाबतच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत आसगावक त्यांची यांनी भेट घेत जूनी पेन्शनबाबत चर्चा केली. यावेळी पवार यांनी नागपूर अधिवेशनामध्ये या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. लवकरच 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अध्यादेश काढण्यात येईल. थोडा धीर धरा आम्ही निर्णय घेतलाच आहे, लवकरच अध्यादेश काढणार असल्याचं म्हटलं आहे.

3 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.याबाबत साहेब लवकर तोडगा काढावा व पुढील टप्पा अनुदान जाहीर करावे अशीही उपमुख्यमंत्री अजित पवार (साहेब) यांना शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर साहेब यांनी विनंती केली.यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले होय आम्हाला याबाबत कल्पना आहे लवकरच निर्णय घेतला जाईल असे ही ते यावेळी म्हणाले.