मुंबई ( प्रतिनिधी ) अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या विविध प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नविन शैक्षणिक धोरण, प्राध्यापक – प्राचार्य पदभर्ती अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.


यावेळी आमदार जयंत आसगांवकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, डॉ. क्रांतीकुमार पाटील, सरचिटणीस प्रा. डॉ. सुधाकर जाधवर , सहसचिव डॉ.संजय खरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.