नव्या कृषी कायद्यांविरोधात काल झालेले आंदोलन हे शेतकरी विरोधी लोकांनी केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी केला. तर ऊस झोन बंदी उठवण्याच्या त्यावेळच्या निर्णयाचे स्वागत कालच्या आंदोलनातील शेतकरी नेत्यांनी कसं केलं, असा सवाल जय शिवराय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांनी केला.