मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला खून आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संदीप वाघ असे या आरोपीचे नांव असून त्याला नगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.  त्याची रवानगी  पोलीस कोठडीत केली आहे.

गेली एक वर्षे संदीप वाघ दिपालीला फोनवरून धमकावत होता. अखेर त्याला अटक करण्यात  पोलिसांना यश आले आहे. नगरमध्ये दिपालीने पाणी प्रश्नावरून २०१९ मध्ये आंदोलन पुकारले  होते. तेव्हा संदीप याने दिपाली यांचा फोन नंबर मिळवला होता. त्यानंतर त्यांने दिपालीला  धमकीचे फोन करण्यास सुरुवात केली होती.

सततच्या फोनला कंटाळून दिपालीने संदीपचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या नंबरवरून फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर याची माहिती दिपालीने आपल्या भावाला सांगितली. अखेर दिपालीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.