मुंबई /प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. ज्यात उद्धव ठाकरेंना 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पुढील दोन दिवसांत उद्धव ठाकरेंकडून मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्थावांवर प्रस्ताव आणि अटी शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. यात ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जागा लढणार आहे.

लवकरच महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. लवकरच तो जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीने जागावाटपावर जवळपास शिकामोर्तब केलंय. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट हा मोठा भाऊ असणार आहे. ठाकरे गट राज्यांमध्ये 22 जागा लढवणार असून शरद पवार गट 10 जागांवर, तर काँग्रेस 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून हातकणंगले जागा राजू शेट्टी यांना सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, सांगली जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरुच आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला तब्बल 17 जागांचा प्रस्ताव दिला आहे. पण हा अशक्यप्राय असल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. आता महाविकास आघाडी वंचितला कोणताच नवीन प्रस्ताव देणार नसून त्यांनी निर्णय घेतल्यानंतर विचार केला जाईल, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमत केलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अजूनही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले, तरी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता महाविकास आघाडीत ते खरंच येत आहेत की न येण्यासाठी कारणांची मालिका उपस्थित करत आहेत? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी निर्णय घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे आता वंचित काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून असेल.