कोल्हापूर (प्रतिनिधी) : जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाच्यातर्फे 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 अखेर शिर्डी येथे 20 वी वरिष्ठ राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा आणि डेमो कप ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाराष्ट्राने 25 सुवर्ण, 12 रौप्यपदक आणि 9 कांस्य अशी 46 पदके मिळवली.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावली. महाराष्ट्रातून 90 मुले मुली ह्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामधील कोल्हापूरमधून अनन्या गिरी गोसावी हिची निवड झाली होती. तर या स्पर्धेत भारतातील 11 राज्यातील 300 खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा शिर्डी येथे मोठ्या दिमाखात पार पडली. वरिष्ठ गटात महाराष्ट्राने सर्वसाधारण Demo ह्या प्रकारामध्ये दुसरे विजेतेपद पटकावले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनन्या गिरी गोसावीने 2 गोल्ड व एक सिल्व्हर मेडल मिळवले.

सहभागी झालेल्या खेळाडूंना आणि यशस्वी खेळाडूंना अशोक दुधारे, विक्रम दुधारे, दीपक निकम मार्गदर्शन लाभले. प्रशांत पारगावकर ह्यानी टिम व्यवस्थापक तर विद्वेष मोरे, कोल्हापूरच्या पल्लवी गोसावी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.