मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही’, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला उघडपणे इशारा दिला आहे, तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राच्या सीमाभागाबद्दल वारंवार विधान करत आहे. त्यांच्या या विधानावर पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

‘अमित शाह यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही, याचा अर्थ याला रगड म्हटले जाते, असे गुलाबराव पाटील म्हणाले.