कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी येत नसल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यांतच राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

यामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत फक्त जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर आस्थापने राहणार बंद राहणार आहेत. सायंकाळी ४ नंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कडक संचारबंदी असणार आहे. तसेच हे निर्बंध अधिक कडक होणार असून कडक अंमलबजावणी होणार आहे. तसेच नागरीकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. मॉर्निंग वॉकला आणि सायकलींगसाठी सकाळी ५ ते स.९ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असे कार्यक्रम,  उपक्रम, परिषदा, मेळावे घेण्यात येवू नयेत.

तसेच सलून,पार्लर,जीम सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायं. ४ पर्यंतच सुरू राहणार असून शनिवार आणि रविवार बंद असणार आहेत. दर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन असणार आहे. तर या संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत हे नियम कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.