आजरा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व तालुक्यांना गट-तट न पाहता भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच भागातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विजयासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर आपण सहज पार करू, असा विश्वास महाविकास आघाडीचे  उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला.

ना. सतेज पाटील यांनी आजऱ्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, उमेश आपटे, संग्रामसिंह नलवडे, आजरा कारखाना चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की, डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्व योजना राबविण्यासाठी आपला मोठा प्रयत्न राहिला आहे. यापुढेही जिल्ह्यात शासनाच्या विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी आपला पुढाकार राहणार असून मंत्रालयातून याकामी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक  चराटी, सूत गिरणीच्या चेअरमन अन्नपूर्णा देवी चराटी, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन अनिल देशपांडे, नगराध्यक्षा ज्योस्त्ना चराटी, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक विलास नाईक, संजय सावंत, दशरथ अमृते, जी.एम. पाटील आदीसह सर्व नगरसेवकांची त्यांनी भेट घेतली.