मुंबई ( प्रतिनिधी ) मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायक पंकज उधास यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांची मुलगी नायब उधास हिने गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले – अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. ते वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंकज उधास यांच्या पीआरने सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता गायकाचा मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गायकाच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. पंकजसारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण डोळ्यात अश्रू आणत गायकाला अखेरची श्रद्धांजली वाहतो आहे.

वैयक्तिक आयुष्यात पंकज उधास ?

गायकाचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जीतपूर येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. दोन्ही भाऊ गायकही होते. पंकज अत्यंत साधे जीवन जगत होते. 2006 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर पंकजने फरीदाशी लग्न केले. त्यांना तीन मुली आहेत.