कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली असून नूतन आयुक्तपदी डॉ. कांदबरी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. कांदबरी बलकवडे या गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. तर कोल्हापूरचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत. दरम्यान मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही.