कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १०२३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १६, आजरा तालुक्यातील, भुदरगड तालुक्यातील ५, चंदगड तालुक्यातील ३, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण ३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ८९५ झाली असून ४६,६३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६७१ जणांचा मृत्यू झाला असून ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.