कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५४४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ६, भुदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २४ एकूण जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ६३७ झाली असून ४३,३०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६६० जणांचा मृत्यू झाला असून ६७१ जणांवर उपचार सुरू आहेत.