कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात तब्बल २,११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरुवार) १,०५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोल्हापूर शहरात ३९५ तर करवीर तालुक्यात ६४८, हातकणंगले तालुक्यात २७० रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३८५,  आजरा- १८, भुदरगड- ३८, चंदगड- ३८, गडहिंग्लज- ७७, गगनबावडा- ८,  हातकणंगले-२७०,  कागल- ७६,  करवीर- ६४८, पन्हाळा- १८२, राधानगरी- ४४, शाहूवाडी-६१, शिरोळ- ८०, नगरपरिषद क्षेत्र- ११९,  इतर जिल्हा व राज्यातील- ६५ अशा २,११९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ४९, २७८  

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ३४, ०१२  

मृतांची संख्या ,५८४  

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १०,६८२