कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ६१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८६१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, आजरा तालुक्यातील २, भुदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील ५, गडहिंग्लज तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १० आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा ६१ जणांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील १, करवीर तालुक्यातील १ आणि हातकणंगले तालुक्यातील १ अशा ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजअखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४७, ८९३ झाली असून ४५, २५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३६ जणांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षात १, ००४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.