इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ५० किलो वजनी गटामध्ये जिम्नॅशियम जिमचा व्यायामपटू केतन विलास शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याला जि.प. चे माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

इचलकरंजी येथे गणेशोत्सवानिमित्त फेस्टिव्हल अंतर्गत विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा घोरपडे नाट्यगृहात या इचलकरंजी फेस्टिव्हलचा प्रारंभ आ. प्रकाश आवाडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेने करण्यात आला. यावेळी विविध गटांमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. ५० किलो वजनी गटामध्ये जिम्नॅशियम जिमचा व्यायामपटू केतन विलास शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी स्वप्नील आवाडे, मौसमी आवाडे, प्रा. शेखर शहा, अजिंक्य रेडेकर, राहुल घाट, तात्यासो कुंभोजे, सचिन गोलंगडे, अन्य पदाधिकारी, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. विजेत्या चेतन शिंदे याला जिमचे प्रशिक्षक प्रवीण धुमाळ, वडील विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.