कोल्हापूर (प्रतिनिधी) : अर्जेंटिना संघाचे माजी स्टार दिग्गज खेळाडू डिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ जुना बुधवार पेठ येथील सेक अकॅडमीच्या वतीने जग्लींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १४ आणि १७ वर्षे वयोगटातील २५ खेळाडूंनी सहभाग घेतला. विजेत्या खेळाडूना अकादमीचे फुटबॉल किट बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. जुना बुधवार पेठेतील टर्फ मैदानावर ही स्पर्धा झाली. त्याआधी मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खेळाडूंनी आपापली कौशले दाखवली. यातून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्यात आले.

१४ वर्षे वयोगटातील विजयी खेळाडू :  

१) मानस लिंग्रस (शनिवार पेठ)

२) पृथ्वीराज पाटील (जुना बुधवार पेठ)

३) समर्थ खाडे (जुना बुधवार पेठ)

17 वर्षे वयोगटातील विजयी खेळाडू :

१) अँड्र्यू मॅक्स (शाहूपुरी)

२) रुंद्रांश चौगुले (लक्षातिर्थ वसाहत)

३) यश पाटील (फुलेवाडी)

उदयोन्मुख खेळाडू घडवण्यासाठी अकॅडमीच्या वतीने अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेस अकादमीचे अध्यक्ष अनिल अडसुळे, दिग्विजय सुतार, शुभम गुरव यांचे सहकार्य लाभले.