वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगरयेथे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत पंजाबचा प्रीतीपाल फगवाडा याला जनसुराज्य किताब मिळाला. यावेळी मैदानावर १५ पुरस्कृत व आदी ३० अशा जवळपास २५० कुस्त्या झाल्या.

यावेळी वारणा साखर शक्ती किताब प्रवीण कोहली याने, वारणा दूध संघ शक्ती किताब पृथ्वीराज पाटील याने व वारणा बँक शक्ती किताब माऊली जमदाडे याने, वारणा दूध साखर वाहतूक किताब शैलेश शेळके याने पटकावला. वारणा विद्यालयाच्या प्रांगणात राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम झाला. बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे, ज्योतिरादित्य कोरे, यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. मैदानात प्रमुख १४, पुरस्कृत ३० कुस्त्यांसह लहान- मोठ्या २५० कुस्त्या झाल्या. इराणमधील मल्लासह देशातील कुस्तीपटू सहभागी झाले होते.

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे सावकर साहेब प्रमुख उपस्थितीत होते सोबत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते डॉ. अशोकराव माने बापू, युवा नेते विश्वेश कोरे, युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, प्रदेशाध्यक्ष समितीचे दादा कदम व वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, कामगार, कर्मचारी व जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.