कागल (प्रतिनिधी ) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बाचणी, ता.कागल येथे आयोजित महायुतीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सुर्यकांत पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात रस्ते, सामाजिक सभागृह, तालीम, इमारत यासाठी कोट्यावधीचा निधी दिला. पी.एम. योजनेद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहे. त्याचबरोबर रेशनच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जात आहे. त्यामुळे विकासाच्या दुरदृष्टी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कागलची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.

कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले, येत्या ०७ मे रोजी आपण सर्वांनी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेब, मनोज फराकटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.भिकाजी सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुधीर पाटोळे, सुनील सूर्यवंशी, नंदकुमार पाटील, दत्ता पाटील केनवडेकर, निवास पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय पाटील, विशाल पाटील, पिटर डिसोझा, राजेंद्र सुतार, अन्वर नायकवडी, नामदेव सडोलकर, म.द. पाटील गुरुजी, एकनाथ पाटील, इकबाल नायकवडी, एम. एस. खामकर, मारुती पाटील, राजेंद्र पाटील, एच. बी. पाटील, जयवंत सडोलकर, भिकाजी पाटील, जीवन पाटील, राजाराम जाधव, रमेश कांबळे, मारुती कांबळे व महायुतीचे प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.