कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या मुक्त सैनिक वसाहत येथे सुरु होणाऱ्या भास्करराव जाधव वाचनालय संचलित ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने ६ स्टडी टेबल्स आणि २५ खुर्च्या हस्तांतरीत करण्यात आल्या.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्लब सनराईजच्यावतीने लोकसहभाग नोंदविला असून यापुढेही शहरातील दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी अधिकाअधिक मदत करुन सहकार्य करावे, उपमहापौर संजय मोहिते यांनी केले.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह नगरसेवक राजसिंह शेळके, नगरसेवक नाना कदम, वैभव माने, रोटरी सनराईजचे इव्हेंट चेअरमन राजू सोमानी, रोटरी सनराईजचे प्रेसिडेंट रोटेरियन श्रीकांत झेंडे, रोटेरिअन चंदन मिरजकर, रोटेरिअन निलेश पाटील, रोटे.दिपक वाघुले, रोटे.नवीन उदयपुरीया, रोटे.मंदार नलावडे, रोटे.राहूल राजशेखर, रोटे.धर्मेंद्र देशपांडे, रोटे.चेतन भोकरे, ग्रंथपाल रत्नाकर जाधव आदि उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रेसिडेंट रोटेरिअन श्रीकांत झेंडे यांनी केले, यावेळी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर रोटेरिअन चंदन मिरजकर यांनी आभार मानले.