वारणा (प्रतिनिधी) : त्रिवेंद्रममधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील शास्त्रज्ञ डॉ. चिदानंद मगदूम यांनी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) वारणानगर कॅम्पसला भेट दिली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,रजिस्ट्रार, संचालक, अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी संवाद साधला.

डॉ. मगदूम यांनी, इस्रोमधील अभियंत्यांच्या शिस्तबद्ध योगदानावर आणि शैक्षणिक कामावरही प्रकाश टाकला. या संवादात प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तसेच कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात इस्रोचे रिमोट सेन्सिंग सेंटर, कोल्याबोरेटिव्ह रिसर्च, स्टुडन्ट एंट्रन्सशिप, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या इस्रो केंद्राला भेटी तसेच वारणा शैक्षणिक संकुलातील शाळेसाठी यंग सायंटिस्ट योजना कशी सुरू करता येईल याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच वारणा विज्ञान व संशोधन केंद्रास भेट देत येथील तारांगण पाहून शिक्षण मंडळाचे कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांनी शिक्षण मंडळाच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.

यावेळी रजिस्ट्रार,डॉ. एस.व्ही. खंडाळ, संचालक, डीन, डॉ. यू. बी. देशन्नवर, अभियांत्रिकी प्राचार्य, डॉ. एस.व्ही. आणेकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्राचार्य, डॉ. ए.एम. शेख, फार्मसी प्राचार्य, डॉ. जॉन डिसोझा, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.