चंदगड (प्रतिनिधी) : अडकुर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून रस्त्यासाठी ५ लाख निधी मंजूर झाला. या निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काल (शुक्रवार) दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल आपटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी सरपंच यशोधा कांबळे, ग्रामसेवक एस. ए. सोनार, एम. एच. कांबळे, बंडू शिवांगेकर, जयवंत देसाई आदी उपस्थित होते.