पुणे ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. तसेच पुणे येथे ही आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

काँग्रेसचे नेते आणि सात वेळा नगरसेवक असलेले आबा बागुल यांच्या व्हॉटस अप स्टेटस ठेवत ‘पुण्यात निष्ठेची हत्या’ म्हणत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीच्या रिंगणात असेनच” असा दावा माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला.

त्याचवेळी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार जाहीर होताच वसंत मोरे यांनी ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यामुळे कोल्हापुरात स्थिती सामान्य असली तरी पुण्यात मात्र काँग्रेसला अंतर्गत बंडाळीला सामोर जावे लागणार का ? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.