कळे (प्रतिनिधी) : कळे येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत मराठी राज्य गीत, मराठी अभिमान गीतांचे गायन करण्यात आले. तसेच मराठी भाषेच्या उत्पत्ती आणि इतिहासासंदर्भात मायबोली या भितीपत्रकाचे हे नियोजन करण्यात आले होते.

मराठी भाषेसंदर्भातील ज्ञान तपासणीसाठी मराठी भाषा सामान्य ज्ञान ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. या सामान्य ज्ञान स्पर्धेत 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी शाळेतील मुलांनी ‘मी मराठी’ हा शब्द मानवी साखळीतून निर्माण करण्यात आला होता. यासाठी पुंडलिक गावडे , रोहिणी मोळे, वर्षा चौगुले, प्रदीप आंगठेकर, निलेश काळे, दिप्ती पाटील, आदींनी तयार केली.

यावेळी निलेश काळे, अजित साळवी, संस्थापक डॉ. सचिन देसाई, रुपाली देसाई, प्राचार्य मेघा देसाई, उप प्राचार्य कल्पना पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.