भोगावती साखरची निवडणूक लागली अन् भोगावती खोऱ्यातील राजकीय वर्तूळात अनेक उलथा- पालथ झाल्या. मुख्य ऐनवेळी भोगावती साखरचे माजी चेअरमन धैर्यशिल पाटील कौलवकर यांनी आपलं वेगळं पॅनल उभा केलं अन् घडामोंडींना वेग आला. या तोफा 19 नोव्हेंबर रोजी मतदान झालं अन् तोफा थंडावल्या. यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते गुलाल कोणाचा याकडे.

आज सकाळपासून मतमोजणी सुरु असून सायंकाळी सहापर्यंत पहिली फेरी पुर्ण झाली असून, राशिवडे बु गटातील दुसऱ्या फेरीअखेर आमदार पी. एन.पाटील यांच्या सतारुढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे मानसिंग विष्णुपंत पाटील 4723, अविनाश तुकाराम पाटील 4228, कृष्णराव शंकरराव पाटील आहेत.

तर विरोधी असणाऱ्या कैलासवासी दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे संग्राम अरूण कलिकते 4061 मते घेऊन आघाडीवर आहेत. तसेच सभासदांनी मतदान करताना मतपेठीत चिठ्ठ्या टाकत नेत्यांना थेट टोले लगावले आहेत. मुख्यत: बोलक्या आणि शेलक्या, मार्मिक शब्दात मतदारांनी रोष व्यक्त केला आहे.