कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ६७ जणांचे कोरोना अहवाल आले आहेत. तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात १२६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६५८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २७, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील २, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ११, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ८, आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण ६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर शहरातील ३, करवीर तालुक्यातील ३, चंदगड तालुक्यातील २, कागल तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, सांगली जिल्ह्यातील १, अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या : ४६,९४८
एकूण डिस्चार्ज : ४१२८०
उपचारासाठी दाखल रुग्ण : ४०९९
एकूण मृत्यू : १५६९