कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४५२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ७६७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १११, आजरा तालुक्यातील ७, भूदरगड तालुक्यातील १२, चंदगड तालुक्यातील १३, गडहिंग्लज तालुक्यातील ३२, हातकणंगले तालुक्यातील ४४, कागल तालुक्यातील १८, करवीर तालुक्यातील ३२, पन्हाळा तालुक्यातील २५, राधानगरी तालुक्यातील ११, शाहूवाडी तालुक्यातील १६, शिरोळ तालुक्यातील १७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ८१ आणि इतर जिल्ह्यातील ३३ अशा एकूण ४५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७६७ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान तब्बल १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४४,४३४.
एकूण डिस्चार्ज ३४,०६४.
उपचारासाठी दाखल रुग्ण ८९२९.
तर आजअखेर कोरोनामुळे १४४१ मृत्यू झाले आहेत.